अंतरराष्ट्रीय

Blog single photo

पाकिस्तनचे एम-16 लढाऊ विमान कोसळले

11/03/2020

इस्लामाबाद, 11 मार्च (हिं.स.) : पाकिस्तानी वायु सेनेतील सर्वोत्तम लढाऊ विमान एफ-१६ आज, बुधवारी कोसळले . पाकिस्तनाची राजधानी इस्लामाबादजवळील शकरपारियामध्ये हा अपघात झाला. पाकिस्तान-डे निमित्त होणाऱ्या परेडसाठी सराव सुरू असताना हा अपघात झाल्याची माहिती आहे. 

अमेरिकन बनावटीचे एफ-16 हे सर्वोत्तम लढाऊ विमान समजले जाते. अमेरिकेकडून पाकिस्तानवा काही वर्षांआधी हे लढाऊ विमान देण्यात आले होते. या विमानाला अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती अधिकृतपणे समोर आली नाही. या घटनेच्या चौकशीसाठी एका समितीची नेमणूक करण्यात आली आहे. 
 हिंदुस्थान समाचार 
Top