खेल

Blog single photo

शिवांजली शिंदें ने फडकवला माणदेशी झेंडा

01/01/2020

सातारा, 01 जानेवारी (हिं.स.) : कोल्हापूर येथे 28 ते 30 डिसेंबर
दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धेतंर्गत
19 वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये शिंगणापूरच्या शिवांजली
भारत शिंदे हिने
57 किलो वजन गटात द्वितीय क्रमांक व
रौप्यपदक मिळवले. तसेच राज्यासाठी ती महिलामल्ल उपविजेता ठरली आहे.
 

पहिल्या कुस्ती मध्ये तिने झारखंडच्या महिलापैलवान नेहाला चित्रपट केले
.त्यानंतरच्या कुस्तीमध्ये दिल्लीच्या महिला पैलवान शालिनी वर
7,2 गुणांनी विजय पटकावला.सेमिफायनल मध्ये पंजाबच्या पै सीमा वर 5,4 गुणांनी विजय पटकावल .मात्र फायनल मध्ये झालेल्या कुस्तीमध्ये हरियाणाच्या
मुलीकडून तिला पराभव पत्करावा लागला त्यामुळे राज्यस्तरीय महिला कुस्तीस्पर्धेसाठी
द्वितीय क्रमांक मिळऊन उपविजेती ठरली आहे . सातारा जिह्यातील माण तालुक्याची
कन्येने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत माणदेशाचा झेंडा फडकवला आहे .महाराष्ट्र
राज्याला दोन नंबरचे पदक संपादन करून दिले.ती सध्या मुरगुड येथील मंडलिक आखाडा
येथे कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहे तिला सुखदेव येरुडकर
,आणि 
दादासो लव्हटे मार्गदर्शन करीत आहेत

 हिंदुस्थान समाचार    


 
Top