मनोरंजन

Blog single photo

सुप्रसिद्ध गायक बप्पी लहरी कोरोनाग्रस्त

01/04/2021


मुंबई, १ एप्रिल, (हिं.स) :  सुप्रसिद्ध गायक बप्पी   लहरी यांना कोरोनाची लागण  झाली  आहे. त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  बप्पी लहरी यांची कन्या रेमा बंसल म्हणाली की, आम्ही आवश्यक ती सर्व काळजी घेतली होती. मात्र तरीही त्यांना करोनाची लागण झाली. त्यांचे वय जास्त असल्यामुळे आम्ही त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्याचा विचार केला आहे. बप्पीदा यांच्या आरोग्याबाबत माहिती मिळताच चाहत्यांकडून प्रार्थना केली जात आहे. 

 हिंदुस्थान समाचार 
Top