अपराध

Blog single photo

अकोला- फटाके फोडणारे बुलेटचे सायलेन्सर पोलिसांनी रोडरोलर ने केले नष्ट

25/03/2021

अकोला, 25 मार्च(हिं.स.)  आजकाल फटाके फोडणाऱ्या बुलेटचा ट्रेंड आहे. मात्र या फटाके फोडणाऱ्या बुलेट मुळे नागरिकांना मोठा त्रास होतो.. त्यामुळे यावर अकोला पोलिसांनी अनोख्या पद्धतीने कारवाई केलीय. फटाके फोडणाऱ्या बुलेटवर वाहतूक शाखेने कारवाई करीत त्या बुलेटचे सायलेन्सर जप्त केले. यानंतर हे सायलेन्सर परत न देता ते सायलेन्सर रोडरोलर खाली नष्ट केले. या कारवाईमुळे बुलेट चालवून फटाके फोडणाऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे. 

अकोल्यात बुलेटवर फटाके फोडणारे सायलेन्सर लावून ते शहरात धावत्या बुलेटमधून फटाके फोडत होते. अशा बुलेटवर शहर वाहतूक शाखेने कारवाई केली. त्यांचे सायलेन्सर ही काढून टाकले. हे सायलेन्सर पोलिसांनी जप्त केले. त्यानंतर हे सायलेन्सर परत करण्याऐवजी पोलिसांनी ते बुलेटचालकास परत केले नाही. त्यानंतर वरीष्ठ अधिकारी यांची परवानगी घेऊन तसेच न्यायालयाची परवानगी घेत शहर वाहतूक शाखेने हे सायलेन्सर रोडरोलर खाली नष्ट केले. या कारवाईमुळे बुलेट चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक जि श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी ही कारवाई केली आहे.
हिंदुस्थान समाचार


 
Top