अंतरराष्ट्रीय

Blog single photo

पाकिस्तानच्या कोर्टाने 14 वर्षीय मुलीचा विवाह वैध ठरवा

08/02/2020

इस्लामाबाद, 08 फेब्रुवारी (हिं.स.) शरियत कायद्यानुसार 14 वर्षीय मुलीला मासिक पाळी येत असल्यामुळे तिचा विवाह वैध ठरत असल्याचा निर्णय पाकिस्तानच्या न्यायालयाने दिलाय. 

 पाकिस्तानातील एका ख्रिश्चन धर्मीय मुलीचे अपहरण करून तिचे एका मुस्लीम व्यक्तीशी बळजबरीने लग्न लावून देण्यात आले होते. तसेच या मुलीचे धर्मांतरही करण्यात आले होते. याविरोधात मुलीच्या पालकांनी न्यायालयात दाद मागितली होती. यासंदर्भात सुनावणी करताना सदर मुलीला मासिक पाळी येत असल्यामुळे ती प्रौढ असून तिचा विवाह वैध असल्याचा निर्वाळा पाकिस्तानी न्यायालयाने दिलाय. पिडीत मुलीच्या पालकांनी या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. 
 हिंदुस्थान समाचार


 
Top