राष्ट्रीय

Blog single photo

राज्यात करोनाग्रस्तांची संख्या 122 झाली- टोपे

25/03/2020

मुंबई, 25 मार्च (हिं.स.) : महाराष्ट्रात करोनाबाधितांची संख्या वाढत असून संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यात करोनाचे 122 रुग्ण झाले आहेत. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरच्या माध्यमातून तपशील दिला. आहे. 

राज्यातील करोना रुग्णांयी संख्या 116 वरून 122 इतकी झाली आहे. बुधवारी सकाळी सांगली येथील एकाच कुटुंबातील 5 सदस्यांना संसर्गातून करोनाची लागण झाल्याचे आढळून आले. तर मुंबईत 5 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तसेच मुंबई शेजारच्या ठाण्यात आणखी एक करोनाचा रुग्ण आढळून आला आहे. 
 हिंदुस्थान समाचार 
Top