अपराध

Blog single photo

जळगाव : आजाराला कंटाळून पोलीस कर्मचार्‍याची आत्महत्या

30/09/2019

जळगाव : आजाराला कंटाळून पोलीस कर्मचार्‍याची आत्महत्या
जळगाव, ३० सप्टेंबर, (हि.स.) : जळगाव पोलीस मुख्यालयातील बँड पथकातील एका पोलिस कर्मचार्‍याने आत्महत्या केल्याची  घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली. जयवंत दिलीप वाडे असे आत्महत्या करणार्‍या पोलीस कर्मचार्‍याचे नाव असून प्राथमिक माहितीनूसार त्याने पोटाच्या आजारा कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. जयवंत वाडे यांनी आत्महत्या केली, त्यावेळेस त्यांची पत्नी घराबाहेर धुणे धुत होती. बर्‍याच वेळानतंर त्यानी घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतू आतून कुठलाही प्रतिसाद न आल्याने, त्यांनी शेजार्‍यांना माहिती दिली. शेजारी राहणार्‍या तरुणांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, असता, जयवंत यांनी गळफास घेतल्याचे दिसले. पत्नी त्यावेळेस एक हबराडा फोडल. जयवंत यांच्या आत्महत्येने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. त्याच्या पश्चात दोन मुले, पत्नी, आई, भाऊ, बहिण असा परिवार आहे. याप्रकरणी पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
हिन्दुस्थान समाचार


 
Top