मनोरंजन

Blog single photo

उत्तर प्रदेशात ' तान्हाजी' करमुक्त, अजय देवगण यांनी केले स्वागत

14/01/2020

 मुंबई, 14 जानेवारी (हिं.स.) :उत्तर प्रदेश सरकारने अभिनेते अजय देवगन यांच्या ' तान्हाजी: दि अनसंग वॉरियर ' चित्रपटाबाबत मोठी घोषणा केली आहे. तान्हाजी चित्रपटास करमुक्त करण्यात आले आहे. राज्य वस्तू आणि सेवा करातून सवलत देण्यात आली आहे. 10 जानेवारी रोजी तान्हाजी थ्री डी रूपामध्ये हिंदी आणि मराठीत देशभरात प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवसापासून प्रेक्षक तसेच समीक्षकांच्या पसंतीला पडलेल्या तान्हाजी चित्रपटाने चार दिवसात 75.68 कोटींचा आकडा गाठला आहे. 

उत्तर प्रदेश सरकारच्या या निर्णयाचे अभिनेते अजय देवगण यांनी स्वागत केले आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले. तान्हाजी चित्रपटास करमुक्त केल्याबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद. आपण जर चित्रपट बघितलात तर मला आणखी आनंद होईल असे ते ट्विटरद्वारे म्हणाले. 

छत्रपती शिवाजी महाराज यांचे शूर सरदार तान्हाजी मालुसरे पराक्रम गाथा दिग्दर्शक ओम राऊत यांनी मोठ्या पडद्यावर साकारली आहे. चित्रपटात अभिनेते अजय देवगन ' तान्हाजी मालुसरे ' त्यांची भूमिका साकारली आहे. तर उदयभानच्या रूपात अभिनेते सैफ अली खान आहे. चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका शरद केळकर यांनी बजाविली आहेत. याशिवाय अभिनेत्री काजोल, अजिंक्य देव, यांच्यासारखे कलाकार आहेत. 

 हिंदुस्थान समाचार


 
Top