अपराध

Blog single photo

धुळे : ट्रक कारच्या अपघातात एक ठार

13/01/2020

धुळे, १३ जानेवारी,(हि.स.) जिल्ह्यातील नटवाडे फाट्याजवळ ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात कार चालक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील नटवाडे फाट्याजवळ रात्री १२ वाजेच्या सुमारास ट्रक (क्र. एमएच४१-एजी-८१०१) ही विरूध्द दिशेने सुसाट वेगाने शिरपूर कडे येत असतांना शिरपूरहुन इंदूरकडे जाणार्‍या कारला ( क्र. एमपी-०९-सीवाय -४२५१) जोरदार धडक दिली. या अपघातात कार चालक विकास रामनारायण चौधरी (वय ३२ रा. इंदूर) हा जागीच ठार झाले. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला.
हिन्दुस्थान समाचार


 
Top