क्षेत्रीय

Blog single photo

खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र बनावट

14/01/2020

सोलापूर 14 जानेवारी (हिं.स.): नुरंदस्वामी  गुरूबसय्या हिरेमठ ऊर्फ खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा अहवाल चौकशी समितीने दिला आहे. यावरून पडताळणी समितीने महास्वामी यांना म्हणणे मांडण्यासाठी १८ जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. महास्वामी यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राविरोधात प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे व विनायक कंदकुरे यांनी तक्रार केली होती. खासदार महास्वामी यांना बजावलेल्या नोटिसीमध्ये तक्रारदार व चौकशीत सादर केलेले शालेय पुरावे यामध्ये लिंगायत अशी जातीची नोंद आहे. 

आपण अनुसूचित जातीचा लाभ घेतला आहे, लिंगायत हा पंथ अनुसूचित जातीपैकी नाही. बेडा जंगम ही जात लिंगायत पंथ समूहातील नसून वेगळी आहे. त्याचा खुलासा करावा. १५ जानेवारी १९८२ रोजी काढलेल्या बेडा जंगम जातीच्या जात प्रमाणपत्राबाबत दक्षता पथकाने चौकशी केली असता १९८२ सालातील जात प्रमाणपत्र नोंदणी असलेले दोन रजिस्टर दिसून आले. जात प्रमाणपत्र नोंद असलेल्या रजिस्टरमधील नोंदीमध्ये अक्षरबदल, शिक्का बदल व नोंदी अलीकडील काळातील असल्याचे तसेच सदर जात प्रमाणपत्रातील मजकूर हा संगणकावर टाईप केलेला आहे. आवश्यक ठिकाणी अक्षरे लहान मोठी केलेली आहेत, असा अभिप्राय चौकशी अधिकारी यांनी दिला आहे. 

हिंदुस्थान समाचार


 
Top