अपराध

Blog single photo

भंडारा : भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत इसमाचा मृत्यू

02/06/2020

भंडारा, 02 जून (हिं.स.) : भंडारा जिल्ह्यातील कोथुर्णा येथे भरधाव ट्रॅक्टरची धडक बसून एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज, मंगळवारी संध्याकाळी घडली. शरद उके (वय. 35 रा. कोथुर्णा) असे मृतकाचे नाव असून तो काही कामानिमित्त वरठी येथे गेला होता. गावी परतताना वाटेत ट्रॅक्टरची धडक बसून त्याचा मृत्यू झाला. 

भंडारा जिल्ह्यात वाळूची वाहतूक करणा-या वाहनांची गर्दी वाढली आहे. अपघाताला कारणीभूत ठरलेले ट्रॅक्टर देखील वाळू घेऊन चालले होते. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच गावक-यांनी परिसरात चक्काजाम करत मृतकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि अवैध वाहतूक थांबवण्याची मागणी केली. अपघातानंतर या  परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

हिंदुस्थान समाचार 


 
Top