क्षेत्रीय

Blog single photo

नांदेड : सुरक्षित अंतर ठेऊन वस्तूंची खरेदी

25/03/2020

नांदेड , 25 मार्च (हिं.स.) देशात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असून या संसर्गजन्य रोगामुळे जनतेच्या मनात चांगलीच भीती निर्माण झाली असून कोरोना पासून बचाव करण्याच्या हेतूने प्रशासनाने युक्ती शोधली असून भाजीपाला खरेदीसाठी तयार केलेल्या चौकटीतच उभे राहून ग्राहकांना खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 देशभरात कोरोना विषाणू संसर्गजन्य रोगाने थैमान घातले आहे.यापासून बचाव करण्यासाठी शासन ,प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे.संचारबंदी सारखे हत्यार शासनाने उपसले आहे.तरी सुद्धा जनता अद्यापही गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत असून अनेक ठिकाणी पोलिसांकडून प्रसाद मिळत आहे.अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे कोरोनापासून इतरांना बाधा होऊ नये यासाठी दोन व्यक्तीत तीन फूट अंतर ठेवणे गरजेचे असून मास्क,सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे.

 त्या अनुषंगाने साहित्य खरेदी करताना एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून ग्राहकांसाठी चौकटी आखून दिल्या असून त्या चौकटीतच एका मागे एक अशा पद्धतीने खरेदी करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.याची अंमलबजावणी वजीराबाद,बर्की चौक,इतवारा आदी भागात पहावयास मिळत आहे
हिंदुस्थान समाचार 


 
Top