ट्रेंडिंग

Blog single photo

काश्मिरातील सैनिकी शाळांचा निक

07/05/2019

नवी दिल्ली, 07 मे (हिं.स.) सीबीएसई बोर्डातर्फे 6 मे रोजी
जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात
 जम्मू-काश्मिरातील सैन्याद्वारे चालवल्याजाणा-या शाळांमधील सर्व
विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. दहावीच्या परीक्षेत या शाळेचा निकाल 100 टक्के लागला असून
विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होते आहे.गेल्या तीन दशकांहून अधिक काळ दहशतवादाचे चटके सोसणा-या
जम्मू-काश्मिरात भारतीय सैन्यातर्फे एकूण 43
आर्मी गुडविल स्कूल चालवल्या जातात. त्यापैकी 3 शाळांमध्ये सीबीएसई बोर्डाचा
अभ्यासक्रम शिकवला जातो. सद्भावना प्रकल्पांतर्कत भारतीय सैन्याचे नॉर्दन कमांड या
शाळा चालवते. स्थानिकांना योग्य आणि दर्जेदार शिक्षण देऊन प्रगतीच्या मुख्य प्रवाहात
आणणे असा या शाळेचा हेतू आहे. सध्या या शाळांमध्ये 15 हजार विद्यार्थी शिक्षण घेत
असून एक हाजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तेथे कार्यरत आहेत.
आर्मी गुडविल स्कूलच्या 3 शाळांमधील
विद्यार्थ्यांनी यंदा (2018-19) सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा दिली होती.
यामध्ये तिन्ही शाळांमधील सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे सीबीएसईच्या
निकालातून विद्यार्थ्यांच्या दहावीच्या परीक्षेसोबतच सैन्याच्या सकारात्मक
प्रयत्नांचे यश देखील अधोरेखीत झाले आहे. हिंदुस्थान समाचार/ माधवी


 
Top