खेल

Blog single photo

गोल्फपटू टायगर वूड्स यांच्या गाडीला अपघात; रुग्णालयात दाखल

24/02/2021नवी दिल्ली, २४ फेब्रुवारी, (हिं.स) : प्रसिद्ध गोल्फपटू टायगर वूड्स यांच्या गाडीचा लॉस एंजलिसमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात ते बचावले आहेत मात्र त्यांच्या पायाला इजा झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, टायगर वूड्स हे एकटेच गाडी घेऊन निघाले होते. ब्लॅकहॉर्स रोडवर त्यांची गाडी घसरून हा अपघात झाला. या अपघातात गाडीचे नुकसान झाले आहे. अपघातामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

हिंदुस्थान समाचार


 
Top