अंतरराष्ट्रीय

Blog single photo

भारतात तात्पुरत्या स्वरुपाची आर्थिक मंदी- मुकेश अंबानी

30/10/2019

रियाद, 30 ऑक्टोबर (हिं.स.) : भारतात सध्या तात्पुरत्या स्वरुवाची आर्थिक मंदी आहे. सरकारच्या उपाययोजनांमुळे त्यावर लवकरच मात करता येईल असे प्रतिपादन रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केले. सौदी अरेबियातील रियाद येथे आयोजित ‘फ्युचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह’ कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. 

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतातील अनेक दिग्गज उद्योगपती उपस्थित होते.
याप्रसंगी अंबानी म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्थेत थोडी मंदी आहे. परंतु ती तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचे माझे मत आहे. अर्थव्यवस्थेला तेजी देण्यासाठी गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या उपययोजना करण्यात आल्या त्याचा परिणाम लवकरच दिसून येईल. पुढील तिमाहित ही परिस्थिती बदललेली जाणवेल असा विश्वास अंबानी यांनी व्यक्त केला. यावेळी सौदी अरेबियाचे प्रिन्स सलमान बिन अब्दुल अझीझ अल सऊद आणि त्यांचे सुपुत्र प्रिन्स मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल अजीज यांचा संदर्भ देऊन अंबानी म्हणाले की, त्यांचे नेतृत्व हे अर्थव्यवस्थेला गती देणारे आहे. भारत आणि सौदी अरेबिया या दोन्ही देशांना उत्तम नेतृत्व लाभले आहे. सौदी अरेबियामध्ये गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये मोठे बदलही पहायला मिळाले असल्याचे अंबानी यांनी सांगितले. 
हिंदुस्थान समाचार


 
Top