राष्ट्रीय

Blog single photo

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केले दुसरे लसीकरण

08/04/2021




नवी दिल्ली,  8 एप्रिल (हिं.स)



प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी सकाळी  
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था-एम्स दिल्ली येथे  कोरोना लसीकरण केंद्रास भेट दिली आणि लसीची  दुसरी मात्रा ग्रहण करीत देशव्यापी लसीकरण
कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
1 मार्चला  पंतप्रधान नरेंद्र मोदींना एम्समध्ये हैदराबादच्या  भारत बायोटेक द्वारा निर्मिती लस देण्यात आली. 



या संदर्भात ट्वीटर द्वारे  नागरिकांना आवाहन करताना  पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "  एम्समध्ये कोरोना लसीची 
दुसरी मात्रा ग्रहण केली. कोरोनाला पराजित करण्यासाठी असलेल्या काही  उपायांपैकी  
लसीकरण एक आहे. आपण जर लसीकरणास  
पात्र असाल तर
CoWin.gov.in.
वर नोंदणी करा."



देशव्यापी कोरोना  लसीकरण कार्यक्रमाचा तिसरा टप्पा 1 एप्रिल
पासून  सुरु झाला असून  45 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना
लस उपलब्ध  होत आहे. याद्वारे व्यापक
लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ झाला आहे. कोरोना 
लसीकरण कार्यक्रमाचा दुसरा टप्पा 1 मार्च पासून सुरु करण्यात आला. केंद्र
सरकारने 16 जानेवारी पासून  देशातील आरोग्य
सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी  कोरोना लसीकरण
सुरू केले.



पुण्याच्या सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया आणि  हैदराबादच्या 
भारत बायोटेक द्वारा निर्मिती कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन स्वदेशी
लसींना अत्यावश्यक आणि आपतकालीन परिस्थितीत 
सीमित वापरासाठी मंजुरी दिलेली आहे. वॅक्सीन मैत्री
' या अभियानाद्वारे भारत अनेक देशांना
भारतात निर्मित कोरोना लस पुरवीत आहे.



 



हिंदुस्थान समाचार


 
Top