अपराध

Blog single photo

जळगाव: वनमजुरच निघाला चंदन चोर

13/03/2020

जळगाव, १३ मार्च (हि.स.) जिल्ह्यातील चाळीसगाव शहरापासून अवघ्या अठरा की. मी. अंतरावर असलेल्या गौताळा अभयारण्यातील पाटणादेवी जंगलात वनमजुराचे काम करणारा वनमजुरच चंदन चोर निघाला आहे. त्यांच्या घरात तब्बल १३ किलो ४०० ग्रॅम वजनाचे चंदनाचे साल काढलेले लाकुड सापडले आहे. वनविभागाच्या वरिष्ठाकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

तालुक्यात पाटणादेवी आणि अभयारण्याच्या परीसरात वनमजूर म्हणून आणि पाटणादेवी अभयारण्याशी संबंधीत काही आजी-माजी कर्मचारी, अधिकारी व प्रतिष्ठीत व्यक्तीं, वन्यप्रेमींचा खास म्हणून ज्याची ओळख असलेला कैलास चव्हाण यांच्या घरात चंदनाचा साठा असल्याची गोपनीय माहिती शुक्रवारी वनविभागाचे उपविभागीय अधिकारी एस.वी. काळे, सहा.वन्यजीव रक्षक कन्नड येथील राहुल शेळके, वनपरिक्षेत्र आधिकारी एम.डी.चव्हाण आदिना मिळाली.

 त्या आधारे कैलास चव्हाण यांच्या चंडीकावाडी येथील घरावर वनविभागाच्या पथकाने छापा टाकला असता, त्यांच्या घरातील पत्राच्या कोठीत चार गोणीमध्ये १३ किलो ४०० ग्रॅम चंदानाची हजारो रुपय किमतीची साल काढलेली लाकडे सापडली. त्यास वनअधिकार्‍यांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्या घरातील चंदनाचासाठा देखील जप्त करण्यात आला. याप्रकरणी कैलास चव्हाण यांच्या विरोधात भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६(१)(ड)(फ)(ई) प्रमाणे गुन्हां दाखल करण्यात आला आहे. त्यास शुक्रवारी चाळीसगाव येथील न्यायालयात हजर केले असता,  त्याला १६ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 
हिन्दुस्थान समाचार


 
Top