क्षेत्रीय

Blog single photo

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेची सातार्‍यात जय्यत तयारी

09/10/2019

सातारा, 09 ऑक्टोबर (हिं.स.) : सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवारी श्री.छ. उदयनराजे भोसले व पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा गुरुवार. 17 रोजी सातार्‍यातील सैनिक स्कूलच्या मैदानावर होणार आहे. या सभेची जय्यत तयारी भाजपच्यावतीने करण्यात येत असून सभामंडपाचे भूमीपूजन विजयादशमीच्या मुहुर्तावर करण्यात आले. 
प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सातार्‍यात प्रथमच जाहीर सभा होत असून शतप्रतिशत भाजप या घोषणेनुसार सध्याच्या विधानसभा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्र भाजपमय करण्याच्या दृष्टीने या सभेस विशेष महत्व आहे. छत्रपती शिवरायांचे  वंशज असलेल्या  उदयनराजे भोसलेंसह विधानसभेचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदनदादा भोसले, डॉ. अतुल भोसले, जयकुमार गोरे, शंभूराज देसाई, धैर्यशिल कदम, महेश शिंदे, दिगंबर आगवणे या जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांसह पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारांच्या प्रचारार्थ होत असलेल्या या सभेकडे सर्वांचे लक्ष आहे. 
हिंदुस्थान समाचार 


 
Top