क्षेत्रीय

Blog single photo

वसई विरार महानगर पालिकेने २२ अभियंतांना केला राम राम!

06/11/2019

पालघर ०६ नोव्हेंबर (हिं.स.) : गेल्या १० वर्षापासून सेवेत असलेल्या वेगवेगळ्या
विभागातील २२
  कनिष्ठ अभियंताना वसई विरार महापालिकेने कोणत्याही
प्रकारची पूर्व सूचना न देता कामावरून कमी केले आहे. हे सर्व अभियंता कंत्राटी
कर्मचारी होते. अचानक घेतलेल्या या निर्णयावर सर्वच अचंबीत झाले असून
, सर्वत्र
भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या अभियंता यांना कमी करण्यामागचे नेमके कारण समोर आले नसले
तरी आस्थापनेवरचा अतिरिक्त भार कमी करण्यासाठी त्यांना नारळ देण्यात आल्याची
कुजबुज संपूर्ण वसई विरार शहरामध्ये आहे.
या २२ अभियंताना सरसकट कामावरून काढून टाकल्यायामुळे
वसई विरार महापालिकेत कंत्राटी पद्धतीत काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांत भीतीची
लाट पसरली आहे. आश्चर्य म्हणजे काही अभियंता हे ८ ते १० वर्ष पासून सेवेत होते.
सर्वच ठेका पद्धतीवर कार्यरत असलेले कामगार ह्यांना आजवर फक्त आश्वासने दिली
गेल्याचे समजते. पण
 आता अचानक कामावरूनच कमी केल्याने ह्या
२२ अभियंत्यांना आणि सध्या कामावर रुजू असलेले ठेका कर्मचारी ह्यांना त्यांचा
उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे.

या संदर्भात महापालिका आयुक्त बळीराम पवार यांनी दिलेल्या
माहिती नुसार सदरचे कर्मचारी हे महापालिका
  सेवेत अधिकृत नसल्याने त्यांना महापालिकेच्या अटी
शर्ती लागू होत नाहीत. तसेच महापालिका प्रभागीय विभागात अतिरिक्त असल्याने त्याचा
ताण आस्थापनेवर येत होता म्हणून जादा कर्मचारी कमी करण्याचा निर्णय महापालिकेने
घेतला आहे. तसेच आवश्यकता वाटल्यास त्यांना पुन्हा सेवेत घेतले जाईल.  

कामावरून कमी केलेल्या अभियंतामध्ये मनीष गणेश पाटिलहिमांशु लावा पाटीरोशन एकनाथ भगतभीम टेम्मा रेड्डीअमित रामचंद्र शिंदेरमेश तुकाराम
देवलेकर
किशोर पुंडलिक पवारकुणाल शशिकांत घरतकेतन रत्नाकर पाटिलप्रवीण बबन तुपेगौरव हरिपाल सिंह
परिहार
महेश गोविंद
शिरिषकर
सूनील अशोक इरकरअमोल शशिकांत राऊतमंदार रघुनाथ पाटिलस्वरूप प्रकाश खनोलकरओम मिलन गवलस्मिता किसन रावकेयूर जयप्रकाश
पाटिल
,विजय दामोदर चव्हाणनिमेष नंदकुमार
मोरे
जितेश वसंत मुक़ने
यांचा समावेश आहे.
 

हिंदुस्थान
समाचार. 


 
Top