मनोरंजन

Blog single photo

अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली, शस्त्रक्रियेचा दिला संकेत

28/02/2021


मुंबई, २८ फेब्रुवारी, (हिं.स) :  ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळाली आहे. त्यांनी स्वतः ब्लॉगच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. तसेच सर्जरी करावी लागणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. यामुळे त्यांचे चाहते चिंतीत झाले आहेत. 'मेडिकल कंडिशन...सर्जरी...मी लिहू शकत नाही, असे त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे.
त्यांनी दिलेल्या या संकेतामुळे त्यांचे चाहते संभ्रमात पडले असून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.

 हिंदुस्थान समाचार


 
Top