खेल

Blog single photo

श्रीसंतचे सर्व आरोप मुर्खपणाचे- दिनेश कार्तिक

23/10/2019

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर (हिं.स.) भारतीय क्रिकेट संघातील एस. श्रीसंत आणि दिनेश कार्तिक यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. श्रीसंतचे सर्व आरोप मुखर्पणाचे असून त्यावर उत्तर देणे सुद्धा अयोग्य होईल असा टोला दिनेश कार्तिकने लगावला आहे. काही दिवसांपूर्वी श्रीसंतने आरोप केले होता की, दिनेश कार्तिकच्या तक्रारीमुळे आपल्याला संघातून बाहेर पडावे लागले होते. त्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना कार्तिक बोलत होता. 

दिनेश कार्तिकमुळे  मला संघाबाहेर जावे लागले, असा आरोप करून एस. श्रीसंत याने खळबळ उडवून दिली होती. कार्तिकने केलेल्या एका तक्रारीमुळे मला संघाबाहेर जावे लागले, असा आरोप श्रीसंतने केला होता. श्रीसंतच्या या आरोपांवर आता दिनेश कार्तिकनं स्पष्टीकरण दिले आहे.  श्रीसंतने केलेली टिप्पणी हा मूर्खपणा असल्याचे कार्तिकनं म्हटले आहे.
यासंदर्भात कार्तिक म्हणाला की, माझ्यामुळे श्रीसंतला संघाबाहेर जावे लागले असा आरोप त्याने केल्याचं माझ्या कानावर आले आहे. हे सर्व आरोप मूर्खपणाचे आहेत आणि त्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देणे हे सुद्धा मूर्खपणाचे ठरेल, असे दिनेश कार्तिक याने सांगितले. यापूर्वी 2013 साली श्रीसंत स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकला होता. त्याच्याविरोधात कारवाई करून आजीवन बंदी आणली होती. मात्र, अलीकडेच सुप्रीम कोर्टाने जलदगती गोलंदाज श्रीसंतला दिलासा दिला होता. त्याच्यावरील आजीवन बंदीची शिक्षा कमी करून त्याचा कालावधी सात वर्षे करण्यात आला होता. सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर श्रीसंत पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सुक आहे.
हिंदुस्थान समाचार


 
Top