अपराध

Blog single photo

गुजरातमध्ये बस उलटली, 20 प्रवाशांचा मृत्यू

30/09/2019

बनासकांठा, 30 सप्टेंबर (हिं.स.) गुजरातमधील बनासकांठा येथील त्रिशुलिया घाट, अंबाजी नतिक भाविकांची बस उलटून झालेल्या भीषण अपघातात 20 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 30 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. हे सर्व प्रवासी गुजरातमधील आणंद येथील आहेत. अंबाजी मंदिराला भेट दिल्यानंतर दर्शन करून परत येताना बसला हा अपघात झाला. हा अपघात नेमका कशामुळे झाला याची अद्याप माहिती समोर आलेली नाही.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त बसच्या चालकांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा किंवा चालकाला झोप लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. बस उलटल्याची माहिती समजताच पोलीस, व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत्युमुखी पडलेल्या सर्वांची ओळख पटवणे अद्याप बाकी आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून दुःख व्यक्त केले आहे. बनासकांठातून खूपच वाईट बातमी मिळाली. दुर्घटनेत मृत्युमुखी झालेल्या व्यक्तींप्रती मी अत्यंत दुःखी आहे. माझ्या संवेदना पीडित कुटुंबासोबत आहेत. स्थानिक प्रशासन मदत कार्य करीत आहे. जखमी झालेले सर्व लोक लवकरात लवकर बरे होवो, अशी माझी प्रार्थना असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलेय. 
हिंदुस्थान समाचार


 
Top