खेल

Blog single photo

दीपक कुमार टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र

05/11/2019

नवी दिल्ली, 05 नोव्हेंबर (हिं.स.) : भारतीय नेमबाज दीपक कुमार याने दोहा शहरात सुरू असलेल्या चौदाव्या आशिया अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. या कामगिरीमुळे दीपक कुमार टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरणारा दीपक कुमार हा दहावा भारतीय नेमबाज आहे. पात्रता फेरीत 227.8 गुणांची कमाई करत दिपकने अंतिम 8 जणांमध्ये प्रवेश मिळवला. यानंतर पदकांच्या शर्यतीत 626.8 गुणांची कमाई करत दीपकने कांस्यपदकावर आपले नाव कोरले. यापूर्वी 2018 साली झालेल्या नेमबाजी विश्वचषकात दिपकने कांस्यपदकाची कमाई केली होती. 

हिंदुस्थान समाचार


 
Top