अपराध

Blog single photo

वसईत जुगार चालवणाऱ्यांवर कारवाई

13/02/2020

पालघर १३ फेब्रुवारी (हिं.स) : वसईत अवैध्यरित्या ऑनलाईन लॉटरी मटका, जुगार चालवणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींकडून पोलिसांनी ७ हजार ५३० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पश्चिमेच्या रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ जवळील आनंद नगर रजनिगंधा बिल्डींगच्या बंद जागेत अवैध्यरित्या ऑनलाईन लॉटरी मटका, जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.


 या माहितीनुसार माणिकपुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. यावेळी ऑनलाईन गोल्डन लॉटरीचे सेंटरचे मालक, जुगार चालवणारा व जुगार खेळणाऱ्या तरुणाला पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. हा तरुण भाईंदर पुर्वेतील रहिवासी आहे.
माणिकपूर पोलिसांनी या तीन ही आरोपीविरोधात गुन्हा करत ७ हजार ५३० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.  

हिंदुस्थान समाचार


 
Top