खेल

Blog single photo

बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनवर एक वर्षांची बंदी

29/10/2019

नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर (हिं.स.) मॅच फिक्सिंगसाठी बुकीशी संपर्क केल्याप्रकरणी बांगलादेशचा अष्टपैलू फलंदाज आणि टी-२०चा कर्णधार शाकिब अल हसनवर दोन वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. या प्रकरणाची माहिती दिली नसल्याच्या आरोपावरून इंटरनॅशनल क्रिकेट कॉन्सिल (आयसीसी)ने त्याच्यावर ही कारवाई केली आहे. शाकिबने आपल्यावरील आरोप मान्य केल्याने बंदीचा कालावधी एक वर्षाने कमी करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या 3 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत- मालिकेला त्याला मुकावे लागणार आहे.

बांगलादेश, श्रीलंका आणि जिम्बॉब्वेच्या विरोधात जानेवारी 2018 मध्ये खेळण्यात आलेल्या सीरिजमध्ये आणि 2018 च्या आयपीएलमध्ये त्याने सट्टेबाजांशी संपर्क साधला होता. मात्र, त्याची माहिती त्याने आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी यंत्रणेला दिली नव्हती. त्यामुळे आयसीसी त्याच्यावर नाराज होती. या घटनेची गंभीर दखल घेऊन आयसीसीने त्याला अभ्यास दौऱ्यापासून दूर ठेवण्याच्या सूचना बांगलादेश क्रिकेट बोर्डाला दिल्या होत्या. आयसीसीचे नियम माहित असूनही त्याचे उल्लंघन केल्याने त्याच्यावर बंदी घालण्यात आली असल्याचं आयसीसीने सांगितलं. दरम्यान, तीनवेळा नियमांचं उल्लंघन केल्याचं त्यानं मान्य केलं आहे. त्यामुळे त्याच्यावरील शिक्षा एका वर्षाने कमी करण्यात आली आहे. दरम्यान, आयसीसीच्या कारवाईनंतर शाकिबने प्रतिक्रिया व्यक्त करताना आरोप मान्य केले आहेत. आयसीसीच्या कारवाईने स्वाभाविकपणे मी निराश आहे. ज्या खेळावर माझे प्रेम आहे, त्याच क्रिकेटला मला मुकावे लागणार आहे. मात्र माझ्यावर लावण्यात आलेले आरोप मला मान्य आहेत. आयसीसीला मी माहिती द्यायला हवी होती, असे शाकिबने म्हटले आहे. 
हिंदुस्थान समाचार 
Top