खेल

Blog single photo

नाशिम : हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफी : १४ वर्षांखालील गट; हरदयाल बाजवाची अष्टपैलू कामगिरी

11/02/2021

नाशिक, ११ फेब्रुवारी (हिं.स) : नाशिक जिल्हा
क्रिकेट असोसिएशन आयोजित
, मेसन ट्रेडर्स व
मेसन डेव्हलपर्स पुरस्कृत हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफी च्या १४ वर्षांखालील गटातील
साखळी सामन्यात निवेक क्रिकेट अकादमीने हरदयाल बाजवाच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर
- १६७ धावा व ५ बळी - यूडीसीएवर मोठा विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना हरदयाल
बाजवा १८३ व लक्ष्य रामचंदानी १०४ ह्यांच्या शतकांच्या जोरावर निवेक क्रिकेट
अकादमी ४८७ धावांचा डोंगर रचला. उत्तरादाखल यूडीसीए ६३ च धावा करु शकल्यामुळे
निवेक क्रिकेट अकादमी ४२४ धावांनी विजयी झाली. गोलंदाजीत देखील हरदयाल बाजवा ५ गडी
बाद केले. व तीन विजयांसह ड गटातील प्रथम स्थान कायम राखले. दुस-या सामन्यात एन एस
एफ ए च्या सूर्याक्स निशानदारने १२९ धावा करून
, तर
नील दीक्षित
ने ५ गडी बाद करून आई तुळजाभवानी विरुद्धच्या विजयात मोठा वाटा
उचलला. व तीन विजयांसह क गटातील प्रथम स्थान कायम राखले.अ गटात नाशिक जिमखाना व ब
गटात नाशिक क्रिकेट अकादमी प्रत्येकी ३ विजायांसह आपआपल्या गटात प्रथम स्थानावर
आहेत.हिंदुस्थान समाचार


 
Top