हैदराबाद, 14 फेब्रुवारी (हिं.स)
जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत जागतिक प्रेम
दिनानिमित्त अभिनेते प्रभास यांच्या
बहुचर्चित, बहुप्रतीक्षित आणि बहुभाषी ‘राधेश्याम ’ चित्रपटाची नवीन झलक पाच भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आली.
या संगीतमय झलकीद्वारे प्रभास आणि पूजा हेगडे यांच्या पात्रांचा परिचय
करून देण्यात आला. नवीन झलक, पार्श्वसंगीत
आणि प्रभास-पूजा
हेगडे यांच्या जोडीस सामाजिक
माध्यमांवर उत्तम प्रतिसाद लाभतो आहे.
बाहुबली अभिनेते प्रभास यांच्या नव्या रुपासाठी
जगातील काना-कोप-यातून सामजिक माध्यमांवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे .
प्रभास आणि दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार
यांचा बहुचर्चित, बहुप्रतीक्षित आणि बहुभाषी ‘राधेश्याम ’
30
जुलैला प्रदर्शित होणार आहे.
राधेश्यामच्या हिंदी गाण्यांसाठी मिथुन आणि मदन
भारद्वाज यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर
तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषेसाठी संगीत दिग्दर्शक जस्टीन प्रभाकर यांची
निवड करण्यात आली आहे.मागिल वर्षी बाहुबली अभिनेते प्रभास यांच्या जन्मदिनी 23 ऑक्टोबरला ‘ बिट्स ऑफ राधेश्याम ’ नावाने एक संगीतमय भेट चाहत्यांना
देण्यात आली. राधेश्याम या प्रेमकथेत विक्रमादित्याच्या
रुपात प्रभास दिसणार आहेत. चित्रपटात पूजा हेगडे
‘प्रेरणा’ ही भूमिका साकार करीत आहेत. 10
जुलै रोजी दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार आणि प्रभास यांच्या ‘राधेश्याम ’ चित्रपटाचे शीर्षक आणि पहिली झलक
प्रसिद्ध करण्यात आली.
राधेश्याम ही एक प्रेमकथा असणार आहे. दिग्दर्शक
राधाकृष्ण कुमार यांच्या राधेश्याम चित्रपटात प्रभास,
पूजा
हेगडे, अभिनेत्री भाग्यश्री, सचिन खेडेकर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगु आणि मल्याळम भाषेत असणार आहे. विशेष
म्हणजे साहो दिग्दर्शक सुजीत रेड्डी प्रमाणेच राधा कृष्ण कुमार सुद्धा
युवा दिगदर्शक असून ' जिल ' हा
एकच चित्रपट त्यांनी यापूर्वी
दिग्दर्शित केला आहे.
माजी केंद्रीय मंत्री, जेष्ठ अभिनेते आणि प्रभासचे काका
कृष्णम् राजू यांच्या गोपीकृष्ण मुव्हीज या निर्मिती संस्थेअंतर्गत चित्रपटाची
निर्मिती होणार आहे. या चित्रपटात यु व्ही क्रीएक्शन आणि भूषण कुमार यांची
टी-सिरीज संस्था आणि अनिल थडानी यांची एए फिल्म्स सुद्धा सहभागी आहे. या चित्रपटात कृष्णम् राजू आणि प्रभास अनेक वर्षानंतर एकत्र दिसणार आहेत.
प्रभास आणि कृष्णम् राजू यांनी ' बिल्ला
' आणि ' रिबेल ' या चित्रपटात एकत्र काम केले आहे.
बाहुबली अभिनेते प्रभास, सैफ
अली खान आणि दिग्दर्शक ओम राऊत यांचा ‘आदिपुरुष ’ चे नियमित चित्रीकरण सुरु झाले आहे. आदिपुरुष
11 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. मागील वर्षी आदिपुरुषचे निर्मिती पूर्व
कार्य सुरु होते. या शिवाय प्रभास प्रशांत
नील यांच्या सलार चित्रपटात श्रुती हसन यांच्यासोबत तसेच अमिताभ बच्चन , दीपिका पदुकोण यांच्या सोबत नाग अश्विन
दिग्दर्शित चित्रपटात दिसणार आहे.
हिंदुस्थान समाचार