अंतरराष्ट्रीय

Blog single photo

कोरोना प्रकोप : जपानमध्ये राष्ट्रीय आणिबाणी जाहीर

07/04/2020

टोकियो, ०७ एप्रिल (हिं.स.) : जपानमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेली ४८४५ प्रकरणे समोर आली असून १०८ जणांचा यात मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जपानमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी कोरोना विषाणूवर लगाम लावण्यासाठी टोकियो, ओसाका आणि पाच इतर ठिकाणी मंगळवारी आणीबाणी जाहीर केली आहे. ही घोषणा बुधवारपासून अंमलात येणार आहे. 


आणीबाणीच्या टप्प्यात राजधानी टोकियो आणि इतर प्रमुख प्रांत कनागावा, सैतामा, चिबा, ओसाका, ह्योगो आणि फुकुओकाचा समावेश आहे. आणीबाणीच्या घोषणेपूर्वी आबे म्हणाले होते की, सध्या अशी परिस्थिती बनत आहे की, त्याचा लोकांच्या जीवन आणि अर्थव्यवस्थेवर वाईट प्रभाव पडत आहे. आज सायंकाळी माझी मुख्यालयात बैठक बोलावून आणीबाणी घोषित करण्याची योजना आहे. त्यांनी टोकियो आणि ओसाकासारख्या शहरी परिसरातील वाढत्या कोरोना विषाणूबाधितांचा हवाला देताना एक दिवसापूर्वीच ही योजना घोषणा केली होती. घोषणा मध्यरात्रीपासून अमंलात येईल आणि या सात प्रभावित क्षेत्रातील गव्हर्नरांना लोकांना घरात राहण्यास बाध्य करणे तसेच उद्योगधंदे बंद करण्याचे अधिकार असतील. 
हिंदुस्थान समाचार


 
Top