अपराध

Blog single photo

नांदेड : शीख समुदायाकडून पोलिसांवर हल्ला; 20 जण अटकेत; 400 जणांविरोधात गुन्हा दाखल; 4 पोलीस जखमी

30/03/2021

नांदेड, ३० मार्च, (हिं.स.) : नांदेडमध्ये शीख समुदायाकडून काढण्यात आलेल्या जंगी मिरवणूक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी 20 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सुमारे 400 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यात 60 जण आरोपी असल्याचे निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आले आहे. अद्यापही पोलिसांकडून आरोपींची शोध मोहिम सुरु आहे. तसेच या हल्ल्यात 4 पोलीस जखमी झाल्याचे समजते. या घटनेनंतर नांदेडमध्ये शांतता पसरली आहे.
नांदेडमध्ये दरवर्षी शीख समाजाकडून होळीनिमित्त होला मोहल्ला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मात्र, यंदा कोरोनामुळे या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, तरीही नांदेडमध्ये शीख समुदायाकडून जंगी मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने काही शीख तरुणांनी नांदेडमध्ये गोंधळ घातला. बॅरिकेड्स तोडून पोलिसांवर हल्ला केला. तसेच परिसरातील गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली.
हिंदुस्थान समाचार


 
Top