राष्ट्रीय

Blog single photo

चणे -फुटाणे विकून शिक्षणासाठी धडपडणाऱ्या संतोषला मुख्यमंत्र्यांकडून दिलासा

14/01/2020

मुंबई१४ जानेवारी, (हिं.स) : मुंबईत चणे -फुटाणे विकून शिक्षणासाठी रात्रीचा
दिवस करणाऱ्या धडपड्या संतोष साबळे याला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
प्रामाणिक प्रयत्न कर
तुला लागेल ती मदत केली जाईल असा दिलासा दिला.सातारा
जिल्ह्यातील माण तालुक्यातील राजेवाडीचा संतोष साबळे रात्री दहा ते पहाटे पाच
वेळेत चौपाटीवर चणे फुटाणे विकून दिवसा मुंबई विद्यापीठात राज्यशास्त्राचा अभ्यास
करतो. त्याचे स्पर्धा परिक्षेतून प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न आहे.
साताऱ्यामधून मुंबईत येऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या संतोष साबळे याची
बातमी प्रसिद्ध झाली होती. संतोष खूप गरीब असून दिवसा तो कलिना येथे
विद्यापीठाच्या ग्रंथालयात अभ्यास करतो आणि सायंकाळनंतर मरिन लाईन्स आणि गिरगाव
चौपाटी येथे शेंगदाणे विकतो. अशा आशयाच्या
 बातमीची दखल घेऊन मुख्यमंत्री ठाकरे यांनी संतोषशी
संपर्क साधण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आपला रात्रीचा नित्यक्रम संपवून
विद्यापिठात जाणाऱ्या संतोषला मंत्रालयात येण्यासाठी संदेश देण्यात आला.मंत्रालयात
मुख्यमंत्री ठाकरे यांनी संतोषची आस्थेने चौकशी केली. त्याची माहिती घेतानाच शिक्षणाच्या
धडपडीचे कौतुक केले. "शिक्षणासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न कर
त्यासाठी तुला लागेल ती मदत केली जाईल,"असा दिलासा दिला. त्यासोबतच संतोषला कोणत्या
प्रकारे मदत करता येईल याची माहिती घेऊन
त्याला अभ्यासासाठी तातडीने सर्वतोपरी मदत करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी
सामाजिक न्याय विभागाला दिले.भारावलेल्या
संतोषने मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वत: दखल घेऊन आपली आस्थेने चौकशी केल्याबद्दल
आभार मानले. यातून प्रेरणा घेऊन आणखी जोमाने शिक्षणासाठी प्रयत्न करण्याचा मनोदय
व्यक्त केला.हिंदुस्थान
समाचार


 
Top