या चार सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या दोन कसोटी सामने चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळले गेले होते. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या मालिकेत पहिली कसोटी इंग्लंडने तर दुसरी कसोटी भारताने जिंकली. मालिका १-१ अशा बरोबरीत असताना उर्वरित दोन कसोटी सामना अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये खेळले जाणार आहेत. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि नवदीप सैनी यांना संधी मिळेल अशी चर्चा होती. पण या दोघांना संघात न घेता उमेश यादवला चमूत समाविष्ट करण्यात आले. तसेच, पहिल्या दोन सामन्यांसाठी चमूत असणाऱ्या मराठमोळ्या शार्दुलला संघाबाहेर करण्यात आले.