मनोरंजन

Blog single photo

'कला कट्टा'चे ऑनलाइन कला प्रदर्शनाचे उद्घाटन

30/05/2020

औरंगाबद 30 मे (हिं.स)
कोरोनाने भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे, सगळेच कलाकार घरात आहे. कलेशी निगडित सर्व गोष्टी कोरोनामुळे थांबल्या आहे. त्यामुळे, कलाकारांनी 'कला कट्टा ' हा अनोखा उपक्रम हाती घेत ऑनलाईन कला प्रदर्शन' आयोजित केले आहे. या 'कला कट्टाचे आज भारत गणेशपुरेंकडून व्हर्च्युअल पद्धतीने थाटात उद्घाटन झाले. यावेळी, अनेक कलाकारांनी कला प्रदर्शनाला ऑनलाईन येत हजेरी लावली. 

 या उद्घाटनाप्रसंगी भारत गणेशपुरेंनी कलावंताशी अनौपचारिक संवाद साधला. यावेळी ते म्हणाले ' लॉकडाउनच्या काळात कलाकार ऑनलाईन पद्धतीने एकत्र येऊन अशाप्रकारे आपली कलात्मकता दाखवत आहेत. कलावंतासाठी हि एक मोठी संधी आहे. कलाकारांनी स्वत:ला लॉकडाउन केल्याशिवाय ते चांगली कलाकृती घडवूच शकत नाही.
'कला कट्टा' संस्थेद्वारे विविध प्रकारचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. कलावंतांनी लाॅकडाऊनमध्ये लाॅकहोऊ नये यासाठी हे प्रदर्शन भरवण्याचे संयोजक रूपेश कलंत्री यांनी सांगितले. या कला प्रदर्शनासाठी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आली. या सर्व कलाकृती सोशल मीडियाद्वारे सर्वांपर्यंत पोहोचल्या आहेत. 
महाराष्ट्रातील बीड, मुंबई , औरंगाबाद या शहरातील विविध कलावंत यात सहभागी झाले. प्रत्येक कलाकाराने व्हिडिओद्वारे आपली कलाकृती सादर केली. विदर्भ, पुणे, कोकण या भागातूनहि कला प्रदर्शनात सहभागासाठी कलावंत इच्छुक आहेत.ऑनलाईन प्रदर्शन पाहण्यासाठी आपण कला कट्टयाच्या युट्युब चॅनलला आपण भेट देऊ शकता.
लॉकडाउननंतर दोन दिवसीय प्रदर्शन हे मूळ कला कट्टा आर्ट गॅलरी इथे ही भरवण्याचा प्रयत्न असेल. 
आगामी काळात इतर मान्यवर प्रदर्शनाला भेट देतील. जे कलावंत या प्रदर्शनात भाग घेऊ इच्छित असतील त्यांनी ७२६४०६६२२१ या नंबरवर संपर्क करावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे. प्रदर्शनात प्राचार्य रवींद्र तोरवणे औरंगाबाद, प्राचार्य प्रवीण मुखेकर कलाशिक्षक,बीड, प्रा. रविकृष्णन,औरंगाबाद, गौरी नरगले मुंबई कलाशिक्षक,औरंगाबाद, सचिन भोरे कलाशिक्षक औरंगाबाद यांच्यासह इतर कलावंतांच्या कलाकृती प्रदर्शनात मांडण्यात आल्या. 

हिंदुस्थान समाचार 


 
Top