मनोरंजन

Blog single photo

‘स्लमडॉग मिलेनिअर’ फेम अभिनेत्याविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल

25/02/2021

मुंबई, २५ फेब्रुवारी, (हिं.स.) : ‘स्लमडॉग मिलेनिअर’ चित्रपटातील अभिनेता मधुर मित्तलच्या एक्स गर्लफ्रेंडने त्याच्याविरोधात मारहाण आणि लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार केली आहे. मुंबईतील खार पोलीस ठाण्यात मधुर मित्तलच्या एक्स गर्लफ्रेंडने ही तक्रार दाखल केली आहे. मधुरने एक्स गर्लफ्रेंडच्या घरी जात तिला मारहाण केल्याचे तिने या तक्रारीमध्ये म्हटले आहे.
मधुर आणि पीडित तरुणीचा ब्रेकअप झाला होता.
मात्र, त्यानंतर मधुरने पीडितेच्या घरात घुसून तिला मारहाण केली. पीडित तरुणीच्या डोळ्यांवर त्याने मुक्का मारला, असेही दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणी कोणालाही अद्याप अटक झालेली नाही.
हिंदुस्थान समाचार


 
Top