अपराध

Blog single photo

अकोला: जागेच्या वादातून युवकाची हत्या

02/06/2020

अकोला, २ जून (हिं.स.) : तालुक्यातील पळसोद येथे जागेच्या वादातून युवकाची हत्या केल्याची घटना आज,मंगळवारी दुपारी घडली. किसन पूर्णाजी पाटेकर असे मृतकाचे नाव आहे. 

दहीहांडा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पळसोद येथील दोन शेजाऱ्यांचा आज दुपारी वाद झाला.या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले.किसन पूर्णाजी पाटेकर यांच्या डोक्यावर फावड्याने वार करण्यात आल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला अशी माहिती आहे.घटनेची माहिती मिळताच दहीहांडा पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली व पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोट ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे.याप्रकरणी दहीहांडा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू असून,दहीहांड़ा पोलीस अधिक तपास करीत आहेत.


जिल्ह्यात हत्येचे सत्र सुरूच

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हत्येचे सत्र सुरूच आहे. एकाच आठवड्यात 7 जणांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 
 हिंदुस्थान समाचार
 
Top