मनोरंजन

Blog single photo

जर्सी चित्रपटाची वर्षपूर्ती

19/04/2020
हैदराबाद, 19 एप्रिल (हिं.स)अभिनेते नानी आणि श्रद्धा
श्रीनाथ यांच्या दमदार अभिनयाने परिपूर्ण असलेला जर्सी चित्रपटास रविवार 19 एप्रिल
रोजी  एक वर्ष पूर्ण झाले. चित्रपटाचे
दिग्दर्शक  गौतम तींनानुरी यांनी
साकारलेल्या भावनिक चित्रपटास प्रेषक तसेच समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद
मिळाला.जर्सी एका माजी क्रिकेटपटूच्या जीवनातील संघर्षांची आणि यशाची  कहाणी आहे. 
बाहुबली सिनेमाचे दिग्दर्शक एस. एस. राजामौलींनी सुद्धा जर्सी चित्रपटचे
कौतुक केले होते. जर्सी  19 एप्रिल  2019 रोजी 
प्रदर्शित झाला होता.तेलुगू प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतर
अभिनेते नानी यांच्या जर्सी चित्रपटाची निर्मिती हिंदीत केली जाणार आहे. जर्सी
हिंदी भाषेतील निर्मितीची जबाबदारी सुप्रसिद्ध सिने-निर्माते अल्लू अरविंद दिल
राजू
 आणि अमन गिल यांच्या सहयोगाने सांभाळणार आहे. चित्रपटाचे
दिग्दर्शन गौतम तींनानुरी यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. विशेष म्हणजे गौतम
तींनानुरी यांनीच मूळ तेलुगू चित्रपटाचे दिग्दर्शन आणि कथालेखन केले आहे.
 अभिनेते शाहिद कपूर  अभिनेते 
नानी यांना साकारलेला
' अर्जुन  ' साकारणार आहेत. चित्रपट 28 ऑगस्ट 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे. 
कबीर सिंह नंतर मूळ तेलुगू  भाषेतील
शाहिद  शाहिद कपूर यांचा हा दुसरा
हिंदी  चित्रपट आहे.जर्सी चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीसाठी अभिनेते
शाहिद कपूर यांनी चित्रीकरणास प्रारंभ केला होता मात्र कोरोनामुळे चित्रीकरण बंद
आहे . शाहिद कपूर  यांच्या सोबत  या चित्रपटात अभिनेत्री मृणाल ठाकूर देखील काम
करणार आहेत. मूळ चित्रपटात श्रद्धा श्रीनाथ यांनी बजाविलेल्या भूमिकेत मृणाल ठाकूर
दिसणार आहेत. तर पंकज कपूर सत्याराज यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
'बाहुबली बिफोर दी
बिगिनींग 
' या नेटफ्लिक्स वरील वेब
सीरिजमध्ये मृणाल ठाकूर शिवगामीचे पात्र 
साकारणार आहेत. यावर्षी मृणाल 
यांनी सुपर
30 आणि बाटला हाऊस सारख्या चित्रपटात देखील काम केले.    हिंदुस्थान
समाचार


 
Top