मनोरंजन

Blog single photo

‘पानिपत’ चित्रपटाचा ‘फस्ट-लूक’ जारी

04/11/2019

मुंबई, 04 नोव्हेंबर (हिं.स.) : मोहेंजोदारो’ चित्रपटानंतर तब्बल 3 वर्षांनी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचे रूपेरी पडद्यावर पुनरागमन होतेय. लवकरच त्यांचा ‘पानिपत’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात संजय दत्त (अहमद शाह अब्दाली) अर्जुन कपूर (सदाशिवभाऊ पेशवे) आणि कृति शेनन (पार्वतीबाई) यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. या कलाकारांच्या गेट-अप मधील ‘फस्ट-लूक’चे फोटो ट्वीटरवर जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे
प्रेक्षकांची चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  पानिपतच्या मैदानावर 14 जानेवारी 1761 रोजी मराठे आणि अब्दाली यांच्यात लढल्या गेलेल्या युद्धावर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटात लढाई हरलेल्या मराठ्यांची शौर्यगाथा दाखवण्यात येणार आहे. अहमद शाह अब्दाली याने ही लढाई जिंकली खरी पण चर्चा घडली ती मराठ्यांच्या साहसाची आणि पराक्रमाचीही. सदाशिवराव-भाऊ यांना युद्धात वीरमरण आले होते. हा सगळा इतिहास आशुतोष गोवारीकर मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहेत. 

हिंदुस्थान समाचार 
Top