मनोरंजन

Blog single photo

विसर्जनापूर्वी दीपिकाने घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

12/09/2019

नवी दिल्ली, 12 सप्टेंबर (हिं.स.) मुंबईतील लालबागच्या राजाची कीर्ती जगभर पसरली आहे. अनंतचतुर्दशीच्या मुहूर्तीवर विसर्जन करण्यापूर्वी आज, गुरुवारी राजाची मंगल आरती करण्यात आली. यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने लालबागच्या राजाला आवर्जुन हजेरी लावली होती. 

लालबागच्या राजाची आरती करतानाचा  तिचा  फोटो सोशल मीडियावर खूपच  व्हायरल होत आहे. भारी  सुरक्षे सह पंडालात आलेल्या दीपिका ने परमेश्वराला प्रार्थना करुन त्यांच्या कडून  आशीर्वाद मिळवला. तीची एक झलक पाहण्या साठी त्याच्या चाहत्यांचा मेळावा लागला होता. त्यामुळे येथून निघायला  तिला  खूपच अडचने आली. रणवीर सोबत झालेल्या लग्ना नंतरचा तिचा हा पहिला गणेशोत्सव आहे.

हिंदुस्थान समाचार 


 
Top