मनोरंजन

Blog single photo

आता नियमित मास्क घालण्याची सवय ठेवा : महेश बाबू

26/05/2020

हैदराबाद,26  मे (हिं.स) जागतिक कोरोना
संकट आणि देशव्यापी संचारबंदीत  अभिनेते
महेश बाबू यांनी नागरिकांना तसेच चाहत्यांना विशेष आवाहन केले आहे. कोरोनाच्या
काळात मास्क घालण्याचे महत्व विशद करताना  
ट्विटर द्वारे  महेश बाबू म्हणाले, " आपण आता संथपणे पण खात्रीने पूर्ववत जीवन जगायला सुरवात
केली आहे. या संपूर्ण घटनाक्रमात मास्क घालणे महत्वाचे आहे. घरातून बाहेर पडताना
मास्क घालण्याची सवय ठेवा. कमीत कमी यामुळे आपण स्वतःची आणि इतरांचे रक्षण करू
शकतो. 

हे थोडं विचित्र वाटेल पण सध्या हेच अत्यावश्यक आहे. आपणास याची सवय करून
घ्यायला हवी. एका वेळी एक पाउल. चला, नवीन जगात नवीन जीवनास सुरवार करुया आणि
आयुष्य पूर्ववद आणूया.  मास्क घालणे ' कूल 'आहे
मी घातले आहे... आणि तुम्ही. " यावेळी महेश बाबू यांनी मास्क घालून स्वःतचे
छायाचित्र
ट्विटर आणि इतर
सामाजिक माध्यमांवर प्रदर्शित करीत  मास्क
लावण्याचा संदेश दिला.हिंदुस्थान समाचार


 
Top