खेल

Blog single photo

सुप्रसिद्ध बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंटचा मृत्यू

27/01/2020

कॅलिफोर्निया, २७ जानेवारी, (हिं.स.) : सुप्रसिद्ध बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंट याचा अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. हवेत असाताना हेलिकॉप्टरला आग लागून हा अपघात झाला. या अपघातात कोबी ब्रायंटसह ९ जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये त्याच्या १३ वर्षीय मुलीचा देखील समावेश आहे.

लॉस एंजलिसपासून ६५ किलोमीटर अंतरावर हे हेलिकॉप्टर कोसळले. हवेत असताना हेलिकॉप्टरला आग लागली आणि हा अपघात झाला. या अपघातात कोणीही वाचू शकले नाही. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर कोबी ब्रायंटच्या मालकीचे होते. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
कोबी ब्रायटंने २०१६ साली निवृत्ती स्विकारली. कोबी ब्रायंट हा तब्बल २० वर्षे नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनमध्ये सक्रिय होता. या काळात त्याने पाच चॅम्पियनशीप आपल्या नावावर केल्या. तसेच १८ वेळा तो 'एनबीए ऑल स्टार' ठरला होता. त्याच्या अपघाती निधनामुळे बास्केटबॉल प्रेमींनी दुख व्यक्त केले आहे.
हिंदुस्थान समाचार


 
Top