मनोरंजन

Blog single photo

अभिनेत्री पूजा हेगडे यांना मोठी संधी

11/02/2020

 मुंबई, 11 फेब्रुवारी (हिं.स.) अभिनेत्री पूजा हेगडे यांना मोठी संधी प्राप्त झाली आहे. अभिनेते सलमान खान याच्या आगामी ' कभी ईद कभी दिवाली ' या चित्रपटात अभिनेत्री पूजा हेगडे काम करणार आहे. चित्रपट 2021 साली प्रदर्शित होणार असून दिग्दर्शन फरहद समजी करणार आहेत तर कथा आणि निर्मितीची जबाबदारी साजिद नाडियाडवाला बघणार आहेत. 

आशुतोष गोवारीकर यांच्या ' मोहिंजोदाडो ' चित्रपटात त्यांनी हृत्तिक रोहन यांच्यासोबत काम केले आहे. त्याच प्रमाणे बाहुबली प्रभास यांच्या आगामी चित्रपटातही पूजा काम करणार आहे. विशेष म्हणजे अभिनेता महेश बाबू, ज्यनिअर एनटीआर, अक्षय कुमार आणि अल्लू अर्जुन या दिग्गजांसोबत काम करण्याची संधी त्यांना अगदी थोड्याच काळात प्राप्त झाली. 


 हिंदुस्थान समाचार


 
Top