खेल

Blog single photo

भारताचा न्यूझिलंडवर दमदार विजय

24/01/2020

ऑकलंड, 24 जानेवारी (हिं.स.) : श्रेयस अय्यरने केलेल्या दमदार खेळाच्या बळावर भारताने न्यूझीलंड विरोधातील पहिल्या टी-20 सामन्यात 6 विकेटने विजय मिळवला आहे. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत 203 धावा केल्या होत्या. तर भारताने 6 चेंडू राखून आणि 5 गडी गमावर हे लक्ष्य पार केले. एकूण 5 सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 

 विजयासाठी  न्यूझीलंडने दिलेले 204 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. हिटमॅन रोहित शर्मा 7 धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 99 धावांची भागिदारी केली. ही जोडी संघाला विजय मिळवून देईल असे वाटत असतानाच राहुल 57 धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ विराट कोहली देखील 45 धावावर माघारी परतला. या दोन विकेटमुळे भारताची अवस्था 3 बाद 121 अशी झाली. तर शिवम दुबे 13 धावा करून बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यरने सर्व सूत्रे हाती घेतील आणि दिग्गज, अनुभवी खेळाडू सोबत नसताना संघाला एक हाती विजय मिळवून दिला. त्याने 29 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 58 धावा केल्या. श्रेयसने 19 व्या षटकातील अखेच्या चेंडूवर षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला. 
 हिंदुस्थान समाचार


 
Top