मनोरंजन

Blog single photo

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार कोरोना पॉझिटिव्ह

04/04/2021

मुंबई, ०४ एप्रिल, (हिं.स.) : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. अक्षयने स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. 
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सर्व प्रोटोकॉल पाळत स्वत:ला आयसोलेट केले आहे. मी सध्या घरातच क्वारंटाईन असून डॉक्टरांनी दिलेले सर्व उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना मी विनंती करतो की, त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी आणि स्वत: ची काळजी घ्यावी, अशा आशयाचे ट्विट अक्षयने केले आहे. 
हिंदुस्थान समाचार


 
Top