अंतरराष्ट्रीय

Blog single photo

ट्वीटर ठप्प झाल्याने नेटकरी हैराण

02/10/2019

नवी दिल्ली, 02 ऑक्टोबर (हिं.स.) जगभरात गेल्या अनेक तासांपासून ट्विटरची सेवा ठप्प झाल्याने नेटकऱ्यांचा हिरमोड झाला. सध्या ट्विटरची सेवा ठप्प असली तरी मात्र ट्विटरच्या डॅसबोर्ड मॅनेजमेंट अॅप असलेल्या ट्विटडेस्कने भारतील काही ठिकाणांसह जगभरात अनेक ठिकाणी काम करणे सुरू केले असल्याची माहिती हाती आली आहे. ट्विटरची ही समस्या मंगळवारी रात्री आठ वाजल्यापासून उद्भवली होती, असे सांगितले जात आहे. 


 यासंदर्भातील माहितीनुसार ट्विटडेकवर लॉगिन केल्यानंतर युजरला ट्विटरच्या मोबाइल साइटवर रिडोयरेक्ट व्हावे लागत होते. ट्विटडेक हे सिंगल स्क्रीनवर ट्विट फीड्स मॉनिटर आणि मॅनेज करण्यासाठी एक वेब आणि डेस्कटॉप सोल्यूशन आहे.
000000000
ट्विटडेक हे एखाद्या निश्चित अशा कीवर्डच्या आधारे फिल्टर लावून युजरसमोर प्रस्तुत करतो. ट्वीटडेक क्रोम, फायरफॉक्स, इंटरनेट एक्स्प्लोरर आणि सफारी ब्राउझरवर काम करतो. हे विंडोज आणि मॅक कम्प्युटर अशा दोन्हींवर काम करतो.

 सुमारे दीड महिन्यापूर्वी ऑगस्टमध्ये ट्विटर जगभरात ठप्प झाले होते. ट्विटरचा सर्व्हर डाउन झाल्यामुळे ट्विटर जगभरात काम करेनासे झाले होते. याबाबत प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एकाच वेळेला गरजेपेक्षा अधिक युजर ट्विटरवर आल्याने हे सोशल मीडिया मायक्रोसाइट डाउन झाले होते. मात्र त्यावेळी ट्विटर सुमारे सव्वा तास ठप्प होते. त्यानंतर ट्विटर पुन्हा सुरू झाले. त्यावेळी ट्विटर ठप्प होण्याची काही कारणे सांगितली गेली असली, तर नेमकी कारणे कोणती होती हे मात्र स्पष्ट होऊ शकले नसल्याचे त्यावेळी अधिकृतपणे पुढे आले नव्हते. 

 ट्विटर डाउन झाल्याने भारतातील लोक सतत हे ट्विटर अकाउंट सुरू झाले का याची तपासणी करत आहेत. भारतात ट्विटर युजची संख्या मोठी असल्याने भारतातील युजरवर ट्विटर ठप्प झाल्याचा मोठा परिणाम होत असतो. गेल्या वेळेला जगभरात ट्विटर डाउन झाल्याने त्यावेळी याचा मोठा परिणाम भारत आणि जापानमधील युजरना झाला होता. 

 लवकरच सर्व पूर्ववत होणार- ट्वीटर 
 जगभरात ट्विटर आणि ट्विटडेस्क ठप्प झाला आहे. या मुळे आपल्याला ट्विट करताना, तसेच नोटिफिकेशन्स मिळवताना, याबरोबरच ट्विटरवरील डायरेक्ट मेसेजेस पाहण्यातही अडचणी येत असतील. आम्ही ही समस्या सोडवण्याच्या कामी लागलो असून लवकरच ट्विटरची सेवा पूर्ववत होईल, असे ट्विटरने स्पष्ट केले आहे. 

हिंदुस्थान समाचार


 
Top