अंतरराष्ट्रीय

Blog single photo

पाकिस्तानात मंदिरावर हल्ला, मूर्तीची विटंबना

27/01/2020

इस्लामाबाद, 27 जानेवारी (हिं.स.) : पाकिस्तानमधल्या सिंध प्रांतातील एका हिंदू मंदिरावर जमावाने हल्ला करून मंदिरातील मूर्तीची विटंबना केल्याची घटना समोर आली आहे. पाकिस्तानी पत्रकार नायला इनायत यांनी या घटनेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ट्विट करताना त्यांनी लिहिलेय की, सिंधमध्ये आता आणखी एका आणि हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली. थारपरकरच्या जमावाने माता राणी भातियाना मंदिरात पवित्र मूर्ती आणि ग्रंथाचे नुकसान केले, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. 


पाकिस्तानच्या सिंध प्रातांत हिंदू मुलीचे अपहरण करणे, त्यांचा बळजबरीने धर्मांतर करणे, यासारख्या घटनेत प्रचंड वाढ झाली आहे. सिंध प्रांतातील जैकोबाबादमध्ये एका हिंदू मुलीचे अपहरण करून तिचे बळजबरीचे धर्मांतर करण्यात आले होते. त्यानंतर मुस्लिम मुलासोबत तिचे लग्न लावून दिले होते. तसेच सिंध प्रांतात जैकोबाबादमध्ये राहणाऱ्या अरोक कुमारी उर्फ महक कुमारी हिचे 15 जानेवारी रोजी अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर जैकोबाबाद मध्ये अल्पसंख्याक समाजाच्या लोकांनी या घटनेविरोधात आंदोलन केले होते. परंतु, पाकिस्तान सरकारने याकडे साफ दुर्लक्ष केले होते. मुलगी अरोक कुमारी हिचे धर्मपरिवर्त करून मुस्लीम तरूण अली रजासोबत लग्न लावून दिले. धर्म परिवर्तन केल्यानंतर अरोक कुमारीचे नाव बदलून अलिजा ठेवण्यात आले होते. याप्रकरणानंतर तेथील अल्पसंख्याकांची अवस्था बिकट असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. 
हिंदुस्थान समाचार


 
Top