'या' व्हिडिओमुळे अभिनेता विवेक ओबेरॉयविरुद्ध दाखल झाला गुन्हा
20/02/2021
मुंबई, २० फेब्रुवारी, (हिं.स) : इन्स्टाग्राम वर व्हिडिओ शेअर करणे अभिनेता विवेक ओबेरॉय याला चांगलेच महागात पडले आहे. हेल्मेट आणि मास्कविना दुचाकी चालवल्याने त्याच्यावर जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवेक ओबेरॉय याने पत्नी बरोबरचा दुचाकीवरील एक व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. त्याखाली त्याने मै, मेरी पत्नी और वो...रिफ्रेशिंग राईड अशा आशयाचे कॅप्शनही दिले आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
सामाजिक कार्यकर्ते डॉ. बीनू वर्गीस यांनी त्याचा हा व्हिडिओ शेअर करत आक्षेप नोंदवला. नियमभंग करत विवेक ओबेरॉय हा चुकीचा संदेश देत आहे असे त्यांनी म्हटले. या ट्वीटची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेतली व त्यानंतर विवेकवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंदुस्थान समाचार