अंतरराष्ट्रीय

Blog single photo

अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेचा निधी थांबवला

15/04/2020

वॉशिग्टंन, 15 एप्रिल (हिं.स.) : कोरोना विषाणूमुळे जग त्राही भगवान झाले असतानाच अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेला जोरदार दणका दिलाय. करोना विषाणू्च्या प्रसाराला जागतिक आरोग्य संघटनेनं गांभीर्यानं घेतले नसल्याचे सांगत अमेरिकेकडून दिला जाणारा निधी रोखला आहे. यामुळे जागतिक स्तरावर खळबळ उडाली असून, जागतिक आरोग्य संघटनेबरोबर संयुक्त राष्ट्र संघाने अमेरिकेच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. 


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनाच्या विषाणूला जागतिक आरोग्य संघटना जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. “चीनमध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याला रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं पुरेसे प्रयत्न केले नाहीत. उपाययोजना करण्यात संघटना अपयशी ठरली. प्राथमिक कर्तव्य पार पाडण्यात आरोग्य संघटना अपयशी झाली आहे आणि करोनाच्या प्रसाराला संघटनाच जबाबदार आहे,’ असा आरोप ट्रम्प यांनी केला.
त्यानंतर अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून देण्यात येणारा निधी थांबवत आहोत, असे ट्रम्प यांनी सांगितले. अमेरिकेच्या निर्णयावर जगातील अनेक राष्ट्रांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. 

अमेरिकेनं घेतलेल्या निर्णयाचा जागतिक आरोग्य संघटनेनं निषेध केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासचिव अँटोनियो गुटेरस याविषयी म्हणाले की, ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय चुकीचा आहे. आरोग्य संघटना असो किंवा सामाजिक स्तरावर मदत करणाऱ्या संघटनांचा निधी कमी करण्याची ही वेळ नाही. करोनाविरोधात संघटना लढत असताना मदत करण्याची गरज आहे. या विषयावर राजकारण केल्यास केवळ मृतांचा आकडा वाढेल, असा इशारा जागतिक आरोग्संय घटनेने दिलाय.

हिंदुस्थान समाचार


 
Top