अपराध

Blog single photo

नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे महिला डॉक्टरवर ऍसिड हल्ला

13/02/2020

नागपूर, 13 फेब्रुवारी (हिं.स.) : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट आणि औरंगाबादच्या जळीत कांडांची राज्यभर चर्चा सुरू असतानाच गुरुवारी 13 फेब्रुवारी रोजी नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे महिला डॉक्टरवर ऍसीड हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडील. सावनेर येथे दुपारी 12.30 वाजेच्या सुमाराला हा हल्ला झाला असून यात पिडीत डॉक्टरसह तिघे जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलेय. किशोर कान्हेरिया (वय 24 रा. पहिलेपार, सावनेर) असे या आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केलीय.यासंदर्भात सावनेर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नागपुरातील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात सहायक प्राध्यापिक असलेल्या डॉ. सोफी सायमा गुरुवारी नेशनल एड्स कंन्ट्रोल आँग्रोनायजेशन (नँको) या प्रोजेक्टकरीता सर्वे करण्यासाठी गेल्या होत्या. घटनेच्या वेळी त्यांच्यासोबत गौरी सोनेकर नामक अल्पवयीन विद्यार्थीनी आणि बंडे अशा दोघीजणी होत्या. डॉ. सायमा सर्वेक्षणाचे काम करीत असताना आरोपी किशोर याने त्यांच्यावर ऍसीड फेकले. यात डॉक्टरसह इतर दोघी देखील जखमी झाल्यात. या हल्ल्यात अल्पवयीन बालिका गौरीचा गळ्याचा भाग भाजल्या गेला आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी किशोरला मारहाण करत पोलिसांच्या स्वाधीन केले. यावेळी नागरिकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती. नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी सावनेर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 
हिंदुस्थान समाचार 
Top