राष्ट्रीय

Blog single photo

युरोपीयन खासदारांची चमू काश्मिरात दाखल, स्थानिकांशी साधणार संवाद

12/02/2020

श्रीनगर, 12 फेब्रुवारी (हिं.स.) : जम्मू-काश्मिरातून कलम 370 हटवल्यानंतर तेथील परिस्थितीचे आकलन करण्याच्या हेतूने युरोपीयन संसदेचे 25 सदस्य कडेकोट बंदोबस्तात बुधवारी 12 फेब्रुवारी रोजी श्रीनगर येथे पोहचले. हे सदस्य काश्मिरातील सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी, महिला पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
युरोपीयन खासदारांच्या या दौ-याच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खो-यात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. 


जम्मू-काश्मिरातून कलम 370 हटवून राज्याची पुनर्रचना करण्याचा निर्णय झाल्यानंतर युरोपीयन खासदारांच्या चमूचा हा दुसरा काश्मीर दौरा आहे. यापूर्वी ऑक्टोबर 2019 मध्ये युरोपीयन संघाचे पहिल्या प्रतिनिधीमंडळाने काश्मीरचा दौरा केला होता. त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये अमेरिकेच्या नेतृत्त्वात दक्षिण कोरिया, मोरोक्को, नाईजेरिया, गुआना, अर्जेंटिना, नार्वे, फिलिपीन्स, टोगो, मालदीव, फिजी, पेरू, बांगलादेश आणि व्हिएतनाम सहित 15 देशांच्या भारतातील राजदूतांनी काश्मीरला भेट दिली होती.  खो-यातील श्रीनगर, बाराबुला, बडगाम इत्यादी भागात युरोपीयन संसदेचे खासदार वास्तव्य करणार असून त्यादृष्टीने विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय. यासोबतच राज्यातील तलावांमध्ये सुरक्षा दलाची वॉटर विंग गस्त घालत आहे.
 हिंदुस्थान समाचार 
Top