क्षेत्रीय

Blog single photo

गोंदिया : मान्सून पूर्व पावसामुळे केळी बागांचे नुकसान

02/06/2020

गोंदिया,०२ जून (हिं.स.)  : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसाचा गोंदिया जिल्ह्यातील शेतक-यांना चांगलाच फटका बसला आहे.  जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात या पावसामुळे केळी बागांचे प्रचंड नुकसान झालेय. 

 सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा / कोयलारी या गावातील  शेतकरी विनोद पुस्तोडे त्यांच्याकडे चार एकर शेती असून गेल्या पाच वर्षांपासून केळी लागवड करीत आहेत, सप्टेम्बर महिन्यात त्यांनी चार एकर मध्ये पाच हजारच्या आसपास केळीची लागवड केली होती तर अनेक झाडांना केळी देखील फुलली होती मात्र अचानक आलेल्या वादळी वाऱ्या व अवकाळी पावसामुळे त्यांची केळीची बाग जमीनदोस्त झाली आहे. यात त्यांचे सुमारे पाच लाख रुपयांचे  नुकसान झाले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून एकट्या सडक अर्जुनी तालुक्यात ३१. २  मिमी पावसाची नोंद झाली आहे.  तसेच वादळी वाऱ्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी झाडांची पडझड सुद्धा झालेली आहे, तर झालेल्या नुकसानी बाबत स्थानिक प्रशासनाने पाहणी केली असून नुकसान भरपाई ची मागणी करण्यात येत आहे. 

हिंदुस्थान समाचा 
Top