मनोरंजन

Blog single photo

'सरीलेरू निकेव्वरू' प्रदर्शनासाठी सज्ज

10/01/2020

हैदराबाद , 10 जानेवारी (हिं.स) अभिनेते महेश
बाबु  यांचा   बहुचर्चीत आणि बहुप्रतीक्षित  
'सरीलेरू निकेव्वरू'   चित्रपट संपूर्ण भारतासह जगातील वेगवेगळ्या देशात प्रदर्शनासाठी सज्ज
आहे.  लष्कर अधिकाऱ्याचा भूमिकेत सुपरस्टार
महेश बाबु  यांना पाहण्यासाठी चाहते सज्ज
आहे. चित्रपटाचे स्वागत करण्यासाठी जागोजागी 
महेश बाबु यांचे मोठं मोठाले पोस्टर
, चित्र लागले आहेत.  चित्रपट शनिवारी 11 जानेवारी रोजी   प्रदर्शित होणार आहे. 'सरीलेरू निकेव्वरूद्वारे  महेश बाबू पुन्हा एकदा  जेष्ठ अभिनेत्री विजयाशांतींसोबत  दिसणार आहेत. यापूर्वी बालकलाकार असताना बाबू
यांनी विजयाशांती यांच्यासोबत काम केले आहे. तर दुसरीकडे  जवळपास
13 वर्षानंतर  काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या
आणि  प्रथितयश अभिनेत्री विजयाशांती
श्रीनिवास  यांचे रुपेरी पडद्यावर पुनरागमन
होणार आहे. चित्रपटात  विजयाशांतीं एका
प्राध्यपकाची भूमिका साकारणार आहेत. तसेच जेष्ठ अभिनेते  प्रकाश राज यात खलनायक साकारणार आहे.समाजातील  विविध समस्यांना एक लष्कर अधिकारी कशा प्रकारे
सोडवतो यावर या चित्रपटातून भाष्य केले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल
राविपुडी  यांनी केले असून संगीत देवी श्री
प्रसाद यांनी दिले आहे. चित्रपटाच्या 
ट्रेलर
टिझर आणि गाण्यांना सामाजिक माध्यमांवर मोठा प्रतिसाद मिळतो आहे.  मेगास्टार चिरंजीवी  यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनपूर्व
कार्यक्रमात  प्रमुख अतिथी म्हणून हजेरी
लावली होती. महेश बाबूविजयाशांतीं यांच्याशिवाय चित्रपटात 
रश्मीका  मंदाना
, राजेंद्र प्रसाद, हरिप्रिया, राव रमेश,
बंडाला गणेश
यांसारखे कलाकार आहेत. चित्रपटाची निर्मिती दिल राजू  यांच्या व्यंकटेश्वरा क्रिएशन
, अनिल शंकर यांच्या एके एंटरटेन्मेन्ट तसेच
महेश बाबू यांच्या जीएमबी  एंटरटेन्मेन्ट
च्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे. 
'सरीलेरू निकेव्वरू' चे शीर्षक गीत जेष्ठ गायक शंकर महादेवन यांनी
म्हटले आहे. चित्रपटाचे चित्रीकरण अवघ्या सहा महिन्यात विक्रमाची वेळात पूर्ण
झाले. यापूर्वी

2019
साली  महेश बाबु    ' महर्षी '
या चित्रपटात
दिसले होते.

हिंदुस्थान समाचार 


 
Top